नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी (ता.१०) महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
याप्रसंगी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त महेश धामेचा, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाड, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, उज्ज्वल धनविजय, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, राज गजभिये, दीपाली नागरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.