नागपूर, दि.3 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त चंद्रभान पराते, धनश्याम भूगावकर, कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, सहायक संचालक संघमित्रा ढोके, तहसिलदार अरविंद सेलोकर, स्वाती इसाई, शंकर बडी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.