संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिवस कार्यक्रम समिती व इतिहास विभागातर्फे 23 मार्च रोजी शहीद दिनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद-ए-आझम भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहण्यात आली. शहीद शहीद-ए-आझम भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना शहीद दिनाविषयी माहिती दिली व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना हुतात्म्यांच्या देशभक्तीच्या मार्गावर चालण्याचे आव्हान केले. उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवती यांनी राष्ट्र सर्वोपरी नारा देत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व आय. क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.रेणू तिवारी, डॉ.जयंत रामटेके आणि डॉ.प्रशांत धोंगले यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्वल सौलंकी व सिमरन पाल तर आभार प्रदर्शन आकाश शेंडे यांनी केले.