संविधान दिन चिरायू होवो चा गगनभेदी गजर
वाडी :- २६ नोव्हेंबर संविधान दिवसाच्या निमित्ताने वाडी येथे प.पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे अमरावती महामार्गावरील पुतळा प्रांगणात माजी जि.प. सदस्य दिनेश बन्सोड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. समितीचे अध्यक्ष प्रमोद भोवरे यांनी तथागत बुद्ध यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन सोमकुवर, सामाजिक कार्यकर्ते गौतम तिरपुडे भीमराव कांबळे, मनोज भागवतकर,देवा दिवे, ईश्वर उके,आनंद रामटेके, नितीन वाघमोडे, प्रवीण तायडे, रोशन बागडे,भोजराज नंदागवळी, भैय्याजी भोंगाडे, विजय वानखेडे इत्यादींनी अभिवादन केले. तदनंतर गौतम तिरपुडे यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक पठण केले. यावेळी संविधान दिन चिराई हो च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
वाडी शहर बसपा
संविधान दिनाचे औचित्य साधून बसपाचे जिल्हा महासचिव राजकुमार बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम राजकुमार बोरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी वाडी शहर अध्यक्ष गौतम मेश्राम, सुधाकर सोनपिंपळे, सुरज वानखेडे, बबलू मेश्राम, साहिल खोब्रागडे, प्रदीप मस्के,दिगंबर मेश्राम,मधूकर शेंडे, सतीश डोंगरे, फिरोज ढवळे इत्यादींनी अभिवादन केले.