नागपूर :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. महसूल उपायुक्त दीपाली मोतीयळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार नारायण ठाकरे, नायब तहसिलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.