नागपूर :- साहित्यकार, लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, कथाकार, उपन्यासकार, कवी, कामगार नेता, कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक असे महान साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त व भारतीय स्वातंत्र्यलढयातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणिततज्ञ, राजकिय तत्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी लोकामान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी थोर विभुतींच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे तसेच लहुजी शक्ती सेना नागपूर अध्यक्ष रमेश पाडन, नितीन वाघमारे, सतीश सिरसवान, महेंन्द्र प्रधान, अंकीत चने, सागर जाधव, विशाल शेंडे, भारत शिन्दे, हर्ष काळे, राहुल शेंडे, बंन्टी इंगळे, राजू साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.