चंद्रपूर :- शहर महानगरपालिकेच्या वतीने अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त मंगेश खवले यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार 30 जानेवारी रोजी आदरांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून व 2 मिनिटे मौन पाळून अभिवादन करण्यात आले.
गांधी चौक येथील महानगरपालिका कार्यालय परिसर व जटपुरा गेटसमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तसेच हुतात्मा दिनानिमित्त सिव्हिल लाईन येथील हुतात्मा स्मारक येथेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. शिवाय प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र वाहण्यात आले.
यावेळी मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग,शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार, नगरसचिव नरेंद्र बोबाटे,डॉ. नयना उत्तरवार,चैतन्य चोरे,वैष्णवी रिठे,सिद्दीक अहमद,आशिष जीवतोडे,शरद नागोसे तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.