– तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून वाहिली आदरांजली
नागपूर :- ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी’ अशी परखड भूमिका मांडणारे, समाजातील अंधश्रद्धाविरुद्ध ज्यांनी आयुष्यभर लढा दिला, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांचा तैल चित्राला मनपा तर्फे पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
तसेच ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, अशी घोषणा देत इंग्रजी जुलमी राजवटीविरुद्ध लढा देणारे व देशातील लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारे अग्रणी नेतृत्व भारतीय असंतोषाचे जनक ‘लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनपा प्रशासकीय इमारतीतील दालनात लोकमान्य टिळक यांच्या तैलचित्रला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच मनपातर्फे दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे स्मारकस्थळी पुतळयाला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, उपायुक्त रविन्द्र भेलावे, उपायुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता अजय मानकर, कार्यकारी अभियंता रविन्द्र बुधाडे, कार्यकारी अभियंता उज्वल लांजेवार, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.