राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांकडून राज्यपाल बैस यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

नवी दिल्ली :- राज्यपाल रमेश बैस यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांचे फोन करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पत्राद्वारे राज्यपाल बैस यांचे अभिष्टचिंतन केले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरून राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हरयाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर छत्तीसगडचे राज्यपाल विश्व भूषण हरिचंदन, राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील व सुधीर मुनगंटीवार, विविध विद्यापीठांचे कुलगुरु, रशियाचे प्रभारी वाणिज्यदूत तसेच लोकप्रतिनिधींनी राज्यपालांना फोन, पत्र तसेच समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार कृपाल तुमाने यांनी क्षणात सोडविल्या नागरीकांच्या समस्या

Thu Aug 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी वाडी :- येथिल लाईफस्टाईल सोसायटी आणि लेक व्यू अपार्टमेंटच्या नागरिकांच्या अनेक महिन्यांपासुनच्या प्रलंबित समस्या खासदार कृपाल तुमाने यांनी अवघ्या काही मिनिटात सोडवल्या रविवार दिनांक ३० जुलै ला खासदार तुमाने यांनी नागरिकाच्या आग्रहास्त वाडी येथिल लाईफस्टाईल सोसायटी मध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी लाईफस्टाईल सह लेक व्यु सोसायटी आणि वाडी मधिल नागरिकांशी चर्चा केली. यावेळी नागरिकांनी त्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com