राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपूर :- सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी शिक्षणाचा लाभ तळागाळातील सर्व लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न केले. अस्पृश्यता व जातिभेद निर्मुलन, स्त्री शिक्षण इ.विविध उपक्रम राबवून सामाजिक सुधारणा घडवून आणल्या, असे थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 वी जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या केन्द्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी सहा. आयुक्त श्याम कापसे, सहा. अधिक्षक  राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, कनिष्ठ अभियंता सुनिल नवघरे, राजेश गजभिये, अमोल तपासे, समीर परमार, विनोद डोंगरे, शैलेश जांभुळकर, नरेंद्र रामटेके, वर्षा खडके, योगीता चर्जे, मेध्यार्थी पानतावणे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाऊसाहेब मुळक आयर्वेद महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

Thu Jun 27 , 2024
नागपूर :- दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य २१ जुन रोजी, भाऊसाहेब मुळ्क आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन, नागपुर येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक योग घेण्यात आला, डॉ. योगेश तुलशान योग प्रशिक्षक यांनी सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान सर्वांकडून आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल करवून घेतला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सोबतच यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com