मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

– कृषी दिनाच्या दिल्या शुभेच्छा

मुंबई :- महाराष्ट्रातील कृषी, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या राज्यातील शेतकरी तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रात सक्रिय, अशा सर्वांना मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आदींनीही पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दि.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

Mon Jul 1 , 2024
मुंबई :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित-धवल क्रांतीचे प्रणेते दि. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड, अमोल मिटकरी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com