रामटेक – होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच ग्रीन लैंड येथे भारतीय जनता पार्टी विधानपरिषदे चे उमेदवार माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली . रामटेक विधानसभेतील 3 ही नगर परिषेदे चे अध्यक्ष,उपाध्यक्ष नगरसेवक,नगरसेवकांची बैठक घेतली यावेळी रामटेक,कन्हान, पारशिवनी येथील संपूर्ण नगरसेवक उपस्थित होते
यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी , भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, रामटेक तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, भाजपा नेते विकास तोतडे ,अविनाश खडोतकर, किशोर रेवतकर,अतुल हजारे, नगर परिषद उपाध्यक्ष आलोक मानकर, यांचे सह भारतीय जनता पार्टी चे प्रमुख नेते उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी विधानपरिषदे चे उमेदवार माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विकास कार्यामुळे क्षेत्रात पकड मजबूत असून त्यांचे स्वभाव मुळे त्यांचे चाहते भरपूर आहेत हे विशेष.त्यांना उमेदवारी मिळाल्याने सर्व भाजपा नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.