सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 55 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (06) रोजी शोध पथकाने 55 प्रकरणांची नोंद करून 33500 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 4400 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 13100 रुपयांची वसुली करण्यात आली.रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 3000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 9000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धंतोली झोन अंतर्गत मे. मंगलम ज्वेलर्स यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. रामलक्ष्मी ट्रव्हलस यांच्या विरूध्द गटर लाइनचे नुकसान आणि सांडपाणी रस्त्यास पसरविल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. नेहरु नगर झोन अंतर्गत मे. आशिष रेस्टॉरेंट यांच्या विरुध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले.

गांधीबाग झोन अंतर्गत मे. इथेन स्वीट्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. देशमुख किराणा शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NMC UNDERTAKES TASK OF CLEANING OF 446 WELLS

Wed Aug 7 , 2024
Nagpur :- As on date there are 860 public wells spread across the city of Nagpur. These wells, under the jurisdiction of Nagpur Municipal Corporation, are mange by 2 Departments viz. 1. Water Work Department (for use other than Drinking purpose) – 713 wells 2. Health Department (breeding of Gappi fish)- 134 wells 13 wells are in dry condition, which […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com