चांदा क्लब येथे होणाऱ्या प्रदर्शनीस मोठा प्रतिसाद

– १४७ मूर्तिविक्रेत्यांनी केली नोंदणी

– लकी ड्रॉ द्वारे स्टॉल वाटप  

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीस मोठा प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १४७ मूर्तिविक्रेत्यांनी येथे विक्रीसाठी स्टॉल्स बुक केले असुन या सर्व विक्रेत्यांना लकी ड्रॉ द्वारे स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे.

येत्या ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्सवास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जावे लागते यावर उपाय म्हणुन चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन मनपातर्फे करण्यात आले आहे.

प्रदर्शनीत नागरिकांना एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार आहे.उत्सव काळात होणारी गर्दी वाहतूक कोंडी यामुळे निर्माण होऊ शकणार नसुन नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता येणार आहे शिवाय या मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील २० भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु इस्त्री, मिक्सर स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत.   

प्रत्येक विक्रेत्यासाठी १० बाय १२ आकाराच्या स्टॉल्सची उभारणी केली गेली असुन विद्युत व्यवस्था,मंडप, फिरते शौचालय,प्रशस्त वाहन पार्कींग व्यवस्था व पूजा साहित्य व सजावट साहित्यांचीही दुकाने येथे उपलब्ध असणार आहेत. बचतगट व इतर मार्फत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असल्याने संपुर्ण प्रदर्शनीला आनंद मेळाव्याचे स्वरूप येणार आहे. त्यामुळे नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येणार आहे.

नोंदणी करण्यास केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने विक्रेत्यांनी संपर्क करून स्टॉल्स साठी नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तान्हा पोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना कृषी संस्कृतीची शिकवण दिली जाते - सुभाष सोमकुवर

Tue Sep 3 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – न्यू खलाशी लाईन येथे तान्हा पोळा साजरा कामठी :- शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण हा पोळा असून बैल पोळा व तान्हा पोळा असा सन साजरा होण्याची महाराष्ट्रीयन संस्कृती अजूनही कायम आहे .तान्हा पोळा हा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळयासाठी साजरा करण्याची प्रथा आहे.लहान मुले या दिवशी लाकडी,मातीच्या नंदी बैलांना सजवून घरोघरी जातात व त्यांना काही दक्षिणा देत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com