जास्तीत जास्ती नागरिकांनी प्रदर्शनीला भेट द्यावी महा मेट्रोचे नागरिकांना आवाहन
नागपूर :- ११ डिसेंबर रोजी झिरो माईल फ्रिडम पार्क येथील सपनों से बेहत्तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या या प्रदर्शनीला नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.नागपूर मेट्रो रेल प्रकल्पात आजपर्यंत झालेल्या अद्भुत कार्याची माहिती नागरिकांना मिळावी याउद्देशाने तयार करण्यात आलेली प्रदर्शनी सोमवारपर्यंत सुरु राहणार आहे. नागरिकांसाठी सकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत प्रदर्शनीला भेट देऊ शकतात. मोठ्या प्रमाणात नागरिक प्रदर्शनाला भेट देत आहेत. प्रदर्शनीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना प्रकल्पाच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे.मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी कश्या प्रकारे महा मेट्रोने कार्य केले, याचा संपूर्ण तपशीत प्रदर्शनीत सादर करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत निर्माणाधीन आणि प्रस्तावित ३ व ४ स्तरीय वाहतूक व्यवस्थेच्या संकल्पनेची प्रशंसा नागरिक करीत आहेत. तर अत्याधुनिक बांधकाम, स्टेशनच्या भव्य इमारतीचे बांधकाम, मध्य नागपुरात उभारण्यात येणारे नवे प्रकल्प व त्याचा आराखडा नागरिकांसाठी खास आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
प्रदर्शनाच्या माध्यमाने दाखवली आहे. महामेट्रो नागपूरच्या चारही दिशांना असलेल्या मार्गिका येथे दर्शवण्यात आल्या आहे. यात प्रामुख्याने डबल डेकर व्हाया-डक्ट, झिरो माईल मेट्रो स्टेशन, नुकतेच महा मेट्रोला मिळालेले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मानांकन दर्शवण्यात आले आहेत.