इस्रायली जनतेमध्ये महात्मा, मोदी आणि मेहता लोकप्रिय: कोबी शोशानी

-इस्रायल येथील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव देणार

मुंबई – इस्रायलच्या लोकांमध्ये महात्मा गांधी, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व संगीत संयोजक झुबीन मेहता अतिशय लोकप्रिय असून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम असल्याचे इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले.

कोबी शोशानी यांनी शुक्रवारी (दि.२८) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

या महिन्यात इस्रायल – भारत यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात इस्रायल भारत संबंध अतिशय दृढ झाल्याचा अभिमान वाटतो असे शोशानी यांनी सांगितले.

आपण स्वतः दुर्गप्रेमी असून महाराष्ट्रातील काही शिवकालीन किल्ल्यांना भेट दिली असल्याचे  सांगून इस्रायल येथील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत विचार विनिमय सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

इस्रायल भारताला जल व्यवस्थापन, निःक्षारीकरण, जलसिंचन, या क्षेत्रात सहकार्य करीत असून इस्रायलने भारतात कृषी उत्पादन वाढविण्यासाठी २९ सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायल मध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके हिब्रू भाषेत असली तरीही स्नातकपूर्व अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत उपलब्ध असून परकीय विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने इस्रायल येथे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायलच्या स्थापनेवर लिहिलेली ‘एक्झोडस’ ही जगप्रसिद्ध कादंबरी आपण वाचली असून ती वाचताना अनेकदा भावुक झाल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारताने ज्यू धर्मीय किंवा कुठल्याही परधर्मीय लोकांबाबत भेदभाव ठेवला नाही असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. इस्रायल – भारत संबंध अतिशय सुदृढ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

बैठकीला इस्रायल वाणिज्य दुतावासातील राजकीय व विशेष प्रकल्प सल्लागार अनय जोगळेकर हे देखील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

डॉक्टरेट मंत्र्याला न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थही न कळणे ही समाजाची शोकांतिका : ऍड. धर्मपाल मेश्राम

Sat Jan 29 , 2022
-पदोन्नतीतील अरक्षणावरून नितीन राऊत पुन्हा तोंडघशी नागपूर, ता. २९ : सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय अनेक दिवस न्यायालयात प्रलंबित राहिला. पुढे राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय घेतला. आता सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देण्यासाठी कोणतेही मापदंड ठरविण्यास नकार देत अनुसूचित जाती आणि जमातींची आकडेवारी गोळा करण्याची राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट केले. मात्र या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!