सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेत ग्रंथपूजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 :- गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक १५ जुलै २०२२ रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथील सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका आणि निःशुल्क वाचनालयात ग्रंथ हेच गुरू या संदेशाला अनुसरून ग्रंथ पूजन करण्यात आले.
संचालक कामगार कवी लिलाधर दवंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ग्रंथवाचन आणि अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी राजकुमार दवंडे, मृणाल वाट, मृणाल ठाकरे, निधी विघे, प्रियंका घोडे, कार्तिक दवंडे, गौरव लायबर, सुहानी फुकट, अक्षरा विघे, सुचिता वानखेडे, सृष्टी दवंडे यांची विशेष उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुंडिकोटा इथे जन आरोग्य समितीची सभा संपन्न

Sat Jul 16 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडिकोटा आरोग्य केंद्रामध्ये जन आरोग्य समितीची सभा घेण्यात आली यावेळी या सभेचे अध्यक्ष जि.प.सदस्या रजनी कुंभरे, जि.प.सदस्य किरण पारधी, सभापती कुंता पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शीतल घोरमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पलाश शहारे, पं.स. सदस्या प्रमिला भलावी,पं.स.सदस्या वनिता भांडारकर, पं.स. सदस्य जितेंद्र चौधरी, आंगणवाडी सुपरवाईजर पुष्पा भांडारकर, कमलेश आथीलकर सरपंच मुंडिकोटा राजेंद्र चामट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!