२१३ झोपडपट्टी धारकांच्या घरी भाडेपट्टे सूपुर्द

नागपूर :- केंद्र व राज्य सरकारने सन 2022 पर्यंत सर्व बेघर कुटुंबाना घरे देण्याची महत्वाकांक्षी मोहीम अंतर्गत ‘सर्वासाठी घरे 2022’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जमीनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करुन देण्याबाबत शासन निर्णयानुसार महानगरपालिकेच्या जागेवरील 16 झोपडपट्यांचे सर्व्हेक्षण पुर्ण करण्यात आलेले आहे. सर्व्हेक्षण पुर्ण करण्यात आलेल्या यादीमध्ये सरस्वती नगर फकीरावाडी, रामबाग, बोरकर नगर, नवीन फुटाळा, मेहतरपुरा सुदर्शन नगर, गुजर नगर, गोरा कुंभारपुरा, सतरंजीपुरा, बोध्दपुरा महारपुरा, गोंडपुरा, शिवाजी नगर, नंदाजी नगर, भुतेश्वर नगर, चिमाबाई पेठ व शोभाखेत बारसे नगर या झोपडपट्टीचा समावेश असुन एकुण 4865 अतिक्रमणधारी वास्तव्यात आहेत.

यापैकी एकुण 2363 झोपडपट्टीधारकांनी पात्रते संबधीची कागदपत्रे सादर केली असुन त्या सर्व झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टा पंजीबध्द करण्याकरीता लागणा-या मुद्रांक शुल्क भरण्याकरीता मागणी पत्र देण्यात आलेले होते. त्यापैकी एकुण 2028 झोपडपट्टीधारकांनी मुद्रांक शुल्क भरलेले असुन त्यांना पंजिबध्द स्थायी भाडेपट्टा देण्यात आलेला आहे. तसेच रामबाग, शिवाजी नगर, भुतेश्वर नगर, नविन फुटाळा, कुंभारपुरा, शोभाखेत, चिमाबाई, गुजर नगर व सरस्वती नगर येथील 335 झोपडीधारकांनी अजून पावेतो मुद्रांक शुल्क व इतर शुल्काचा भरणा केलेला नाही . त्यामुळे रामबाग येथील 89 भाडेपट्टे, शिवाजी नगर येथील 20, भुतेश्वर नगर येथील 25, नविन फुटाळा येथील 68, चिमाबाई पेठ येथील 2, गुजर नगर येथील 5 व सरस्वती नगर येथील 4 असे एकुण 213 भाडेपट्टे लाभार्थ्याच्या दारी पोहचविण्याचे कार्य डॉ. अभिजीत चौधरी आयुक्त तथा प्रशासक, म.न.पा. नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात कौशल्य संपन्न उपक्रमांचा शुभारंभ

Sat Sep 21 , 2024
– राज्यातील १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ वर्धा :- पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना आयडी कार्ड, प्रमाणपत्र, स्किल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अमरावती येथील पीएम मित्र पार्कचे ई-भूमिपूजन, १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com