संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पारशिवनी :- आजी-आजोबा आणि नातवंड यांचे नाते घट्ट असतं नातवंडाचे गोकुळ जेव्हा घरात असते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज बघण्यासारखे असते. हसत खेळत घर त्यांना आयुष्य भरभरून जगण्याची मदत करते. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आजी-आजोबांचे महत्त्व कळावेे त्यांनी केलेले कष्ट कळावे म्हणुन आज पारशिवनी येथील केसरीमल पालीवाल विद्यालयात आजी-आजोबांची जणु शाळाच घेण्यात आली. त्यांच्या सोबत विद्यार्थ्यांनी गप्पागोष्टी केल्या तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. अंताक्षरी, संगीत खुर्ची यांच्या मध्ये विद्यार्थी आणि आजी आजोबा रमुन गेले. त्यांना त्यांच्याच बालपणीची आठवण झाली. शिक्षक वर्ग ही भावुक झाले आणि जणु आजी-आजोबांचीच शाळा भरली. आजी-आजोबा दिवसा निमित्त केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी येथे कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका हिमांगी पोटभरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्याध्यापिका चित्रा कहाते यांनी सूत्रसंचालन केले. तर शिक्षक रोशन लेंडे आणि विकास ढोबळे यांनी अंताक्षरी कार्यक्रम घेऊन सर्वांना लयबद्ध केले. आभार प्रदर्शन लोणारे यांनी व्यकत करून गुणवंता मौदेकर, आनंद मैंद, संदीप जावळे, सोमकुवर, चौकसे, पालीवाल, उराडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जिम्मेदारी सांभाळुन सहकार्य केले.