कोदामेंढी :- कामठी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा उमेदवार यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांच्या पुन्हा या विधानसभा क्षेत्रात दुसऱ्यांदा सलग पराभव करत, तर कामठी विधानसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करत कोणत्याही निवडणुकीत अपराजित राहण्याच्या विक्रम कायम ठेवला.त्यामुळे आज सायंकाळी येथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून व डीजे लावून संपूर्ण गावात नाचत गाजत मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात विजय उत्सव साजरा केला.
याप्रसंगी माजी जि प सदस्य शकुंतला हटवार, माजी उपसभापती अशोक हटवार, माजी सरपंच भगवान बावनकुळे, उषा बावनकुळे,नरेश बावनकुळे, प्रकाश मेश्राम, कैलास बावनकुळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर, ग्रामपंचायत सदस्य विष्णू बावनकुळे, रवि ठवकर , सदानंद मेश्राम,अनिता नामदेव हटवार, रूपाली अनिल अनिल ठाकरे, अंजली अमोल मोहूर्ले , कोमल पंकज खडसे, भाजयुमो तालुकाध्यक्ष वैभव हटवार, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष हर्षल तांबुलकर, कट्टर हिंदू समर्थक ललित निमकर,निलेश बावनकुळे, राहुल हटवार , उमेश बावनकुळे, संदीप बावनकुळे, अविनाश बावनकुळे, अमोल राजू बावनकुळे, अमोल राधेश्याम बावनकुळे,अशोक ठाकरे, नथू ठाकरे , नथ्थू हटवार, केशव बावनकुळे, मारोती हटवार, नामदेव हटवार , उमेश हटवार, रामचंद्र हटवार , विजय बावनकुळे, धनपाल मेश्राम ,लकी बावनकुळे, पंकज खडसेसह शेकडो कार्यकर्ते या विजयोत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत सामील झाले होते.