विद्यापीठाचा पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग आणि आर.डी.आय.के. महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग आणि आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेरा यांचे संयुक्त विद्यमाने 39 वी आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे भव्य आयोजन विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर करण्यात आले असून स्पर्धेचे उद्घाटन युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे, डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. अतुल पाटील व पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत उपस्थित होत्या.याप्रसंगी प्रमुख अतिथी संचालक डॉ. अविनाश असनारे व डॉ. राजेंद्र देशमुख यांनी मार्गदर्शनातून खेळाडूंचे मनोबल वाढवून मैदानी खेळाचे महत्व विषद केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. नितीन धांडे यांनी मैदानी खेळाचे जीवनातील महत्व आणि खेळाप्रसंगी असलेल्या भावना यावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल पाटील यांनी केले. संचालन विवेक साती यांनी, तर आभार विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील शिक्षक डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अतुल बिजवे, डॉ. सविता केने, डॉ. विजय निमकर, कु. सविता बावनथडे, सौरभ त्रिपाठी, निलेश इंगोले तसेच विभागातील विद्याथ्र्यांनी अथक परिश्रम घेतले. मैदानी स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्नित 140 महाविद्यालयांतील जवळपास 1405 स्पर्धकांनी तसेच पाचही जिल्ह्रांतील क्रीडा संचालकांनी सहभाग नोंदविला