संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे कामठी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील स्मारकाचे विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले आहे या भव्य नवनिर्माण स्मारकचा लोकार्पण सोहळा दिनांक १० एप्रिल गुरुवारी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून टेकचंद सावरकर माजी आमदार कामठी- मौदा विधानसभा,अरविंद कुकडे प्रांत सह संपर्क प्रमुख रा.स्व.संघ.,सुलेखा कुंभारे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, दत्ता शिर्के राष्ट्रीय सचिव युवा चेतना मंच उपस्थित राहतील. याप्रसंगी भव्य ढोल ताशा पथक वादन , आखाडा, दांडपट्टा, २५१ सुहासिनी च्या हस्ते महाआरती करण्यात येईल तर विशेष आकर्षण म्हणून फटाका शो व लाईट शो चे भव्य चे आयोजन करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्याला जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित राहावे अशी विनंती श्रीमंत योगी स्मारक समिती, शिव नित्य पुजन समीती युवा चेतना मंच तर्फे करण्यात आली आहे.