पारडसिंगा येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन

रामटेक :- रामटेक लोकसभा मतदारसंघातील काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले होते. माझ्या (खासदार कृपाल तुमाने) वैद्यकिय कक्षातर्फे भव्य शिबिराचे करण्यात आले होते. शिबिरात आयुष्यमान कार्ड आणि मोफत चष्मेही वाटप करण्यात आले. माझ्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

शिबिरात विविध रोगांचे तज्ञ डॉक्टर्स असून सर्व रोगांचे निदान करण्यात आले. या भव्य आरोग्य शिबिरात ८३२ रुग्णांनी नोंदणी केली. तर 684 रुग्णांना चष्मे वाटप आणि 65 रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. शिबिरात नेत्ररोग, मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसन रोग यासारख्या आजारांच्या तपासण्या आणि उपचार करण्यात आले. तसेच डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मांचे सुद्धा वाटप करण्यात आले. ज्या वृद्धांना डोळ्याचे ऑपरेशन्स सांगितले, त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटल मधे ऑपरेशन करिता नेण्याची व परत आणण्याची आणि इतर सर्व व्यवस्था मी केली आहे.

मी वृद्ध आणि रूग्णांशी संवाद साधला. तसेच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा प्रमुख संदीप इटकलवर, उपजिल्हाप्रमुख विनोद सातंगे, युवा सेना जिल्हाप्रमुख राज तांडेकर, काटोल शिवसेना तालुका प्रमुख  गंगाधर वंजारी, शहर प्रमुख संजय भोंडे, शिवसेना जिल्हा संघटक मिलिंद देशमुख, नेहा भोकरे, पुरूषोत्तम धोटे, रितेश हेलोंडे, तिलक क्षिरसागर,निता भोंडे, कपिल गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला; केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकष डावलल्याने वादाची चिन्हे 

Fri Jan 5 , 2024
मुंबई :- देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण (टॅप) केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या आणि त्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या रश्मी शुक्ला यांची राज्य सरकारने अखेर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. सहा महिन्यांची सेवा शिल्लक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करावी, असा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकष असताना या मुदतीपेक्षा कमी कालावधी मिळणाऱ्या शुक्ला यांची नियुक्ती केल्याने वादाची चिन्हे आहेत. रश्मी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!