नागपूर :- कामठी तालुक्यातील रनाळा येथे नुकतेच भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. या भव्य शिबिराचे आयोजन नागपूर जिल्हा शिवसेना व खासदार कृपालजी तुमाने वैद्यकिय कक्षातर्फे करण्यात आले होते. खासदार कृपाल तुमाने यांनी शिबिरला भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षामार्फत जिल्हाभर आरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे. शिबिरात विविध रोगांचे तज्ञ डॉक्टर्स असून सर्व रोगांचे निदान करण्यात येते. रनाळा गावात देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात 1575 नागरिकांनी तपासणी करून घेतली. 769 नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या वृद्धांना डोळ्याचे ऑपरेशन्स सांगितले, त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटल मधे ऑपरेशन करिता नेण्याची व परत आणण्याची आणि इतर सर्व व्यवस्था देखील खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून करण्यात आली आहे.
खासदार तुमाने यांनी शिबिराची पाहणी करत वृद्ध आणि रूग्णांशी संवाद साधला. तसेच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, युवासेना पुर्व विदर्भ सचिव शुभम नवले, रनाळा ग्रामपंचायत सरपंच पंकज साबळे, उपसरपंच अंकिता तळेकर, अमोल गुजर, उज्वल रायबोले, संजय कनोजिया, विनोद सातांगे, चंद्रहास राऊत, राज तांडेकर, उमेश कतुरे, नागोराव साबळे, स्वप्नील फुकटे, प्रदीप सपाटे,विमल साबळे, मनीषा बिडकर, अर्चना ठाकरे,सुनीता नंदेसर, स्मिता भोयर, वैद्यकिय कक्षाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.