ब्राह्मणी (कळमेश्वर) येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षातर्फे आयोजन

नागपूर :- कळमेश्वर येथील ब्राह्मणी येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्हा शिवसेना व खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षातर्फे भव्य शिबिराचे करण्यात आले होते. शिबिरात आयुष्यमान कार्ड आणि मोफत चष्मेही वाटप करण्यात आले. खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षामार्फत जिल्हाभर आरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे. शिबिरात विविध रोगांचे तज्ञ डॉक्टर्स असून सर्व रोगांचे निदान करण्यात आले. आरोग्य शिबिरात 1290 रूग्णांनी नोंदणी केली. तर 986 रूग्णांना चष्मे वाटप आणि 60 रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली.

शिबिरात नेत्ररोग, मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसन रोग यासारख्या आजारांच्या तपासण्या आणि उपचार करण्यात आले. तसेच डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मांचे सुद्धा वाटप करण्यात आले. ज्या वृद्धांना डोळ्याचे ऑपरेशन्स सांगितले, त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटल मधे ऑपरेशन करिता नेण्याची व परत आणण्याची आणि इतर सर्व व्यवस्था देखील खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून करण्यात आली आहे.

खासदार तुमाने यांनी शिबिराची पाहणी करत वृद्ध आणि रूग्णांशी संवाद साधला. तसेच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी युवासेना महाराष्ट्र सचिव शुभम नवले, युवासेना रामटेक लोकसभा प्रमुख रजभाऊ तांडेकर,जिल्हा प्रमुख विनोद सातंगे, युवासेना जिल्हाप्रमुख सतिश चालखोर, जिल्हा संघटक तिलक क्षीरसागर, युवासेना तालुकाप्रमुख मंगेश गमे, नागपूर शहर प्रमुख मोरेश्वर कटारमल, वैद्यकिय कक्ष समन्वयक सुरेंद्र गिरी, कळमेश्वर तालुकाप्रमुख गुणवंता नागपुरे, तालुका संघटक जयश्री आकोटकर, शहर प्रमुख मनिषा तांबे, प्रगती तरार, योगिनी राऊत, शहर प्रमुख अनुग्रह तिडके, विभागप्रमुख राजू धार्मिक, उपतालुका प्रमुख आकाश घायवट, उपशहर प्रमुख भूषण कौरती, संपर्क प्रमुख श्रीधर लोणारे, उपशहर प्रमुख आकाश दुर्गे, समन्वयक निहाल सावरकर, संपर्कप्रमुख निलेश रोडे, समस्त पद अधिकारी व युवसैनिक, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पवार साहेबांनी टाकलेल्या जाळ्यात अडकू नका !

Mon Jan 8 , 2024
आव्हाड यांनी ‘राम हा मांसाहारी होता आणि त्यामुळे तो बहुजन समाजाचा होता’ हे जे विधान केलंय ते शरद पवार  व्यासपीठावर असताना केले आहे . शरदराव हे पट्टीचे राजकारणी आहेत .’ उडणाऱ्या पक्षाची पिसे मोजणारा राजकारणी ‘ अशी त्यांची कीर्ती आहे आणि ती खरी देखील आहे . आव्हाड यांच्या विधानानंतर काय गोंधळ उडेल , कशावरून उडेल आणि तो कोण उडवेल हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com