शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासघात धोरणाविरोधात आदिमांचे भव्य धरणे आंदोलन – आदिम नेत्या ॲड.नंदा पराते

– संविधान चौक, नागपूर येथे आदिम हलबा,हलबी आदिवासींचे भव्य धरणे आंदोलन 

नागपूर :- आदिम हलबा ,हलबी जमातीच्या विविध मागण्यांना घेऊन राष्ट्रीय आदिम कृति समितीने दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी विधानसभेवर पुकारलेल्या मोर्चात लाखोंच्या संख्येत सामील होऊन शासनाला आपल्या शक्तिची नोंद घेण्यास भाग पाडले. सतत तीन महिने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनास यशस्वी करण्यास कष्ट घेणारे समाजातील ज्येष्ठ मंडळी ,राष्ट्रीय आदिम कृति समितीचे वरीष्ठ नेते ,सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक/राजकिय कार्यकर्ते,महिला मंडळी ,युवा वर्ग व विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी यांनी आंदोलनात जीव ओतले तरी न्याय मागण्या पूर्ण होत नसल्याने आदिम हलबा,हलबी आदिवासींचा असंतोष दाखविण्यासाठी राष्ट्रीय आदिम कृति समितीच्या माध्यमाने संविधान चौक,नागपूर येथे भव्य धरणे आंदोलन होणार आहे असे समितीचे संयोजक आमदार विकास कुंभारे, विश्वनाथ आसई, ॲड.नंदा पराते, दे.बा.नांदकर , धनंजय धापोडकर,दीपराज पार्डीकर,राजेंद्र सोनकुसरे,प्रवीण भिसीकर,भास्कर पराते, ओमप्रकाश पाठराबे,पुरुषोत्तम सेलूकर,प्रेमलाल भांदककर, राजेश बोकडे,जितेंद्र मोहाडीकर,प्रदीप पौनीकर,मोरेश्वर पराते, श्रीकांत ढोलके,शिवशंकर रणदिवे,भास्कर चिचघरे यांनी जाहीर केले.

आदिमांच्या शिष्टमंडळास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलाविले , या सर्वच चर्चेत राष्ट्रीय आदिम कृति समितीने आपल्या सर्व मागण्या रेटून धरल्या होत्या आणि त्या पूर्ण करण्याचे दिशेने उपमुख्यमंत्री यांनी सहमती दर्शविली होती. घटना यादीत अमेंडमेंटच्या संदर्भात दुरूस्ती प्रस्ताव केंद्र शासनाला त्वरीत पाठविणे, जात प्रमाणपत्र व वैधतापत्र निर्गमित करणे,टाळाटाळ करणारे अधिकार्यावर कारवाई करणे,प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढणे,अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे तसेच हलबा जमातीच्या बेरोजगार युवकांसाठी एक हजार कोटीं रुपयांचे भाग भांडवलासह महामंडळ निर्माण करण्याचे शब्दही त्यांनी दिले होते.या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रीय आदिम कृति समितीने नियमित पाठपुरावा केले तरी अजून एकही मागणीवरशासनाकडून अंमलबजावणी झालेली नाही. अधिसंख्य कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा प्रस्ताव मंजूर होईल असाही विश्वास देण्यात आला होता पण तोही पूर्ण झाला नाही. यामुळे आदिम हलबा,हलबी आदिवासींमध्ये प्रचंड असंतोष आहे.

गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र व केंद्रात भाजप चे सरकार आपण निवडून दिले आहे.आम्ही सरकारात बसलो तर आपले सगळे प्रश्न त्वरीत सोडवू असे आश्वासन भाजपच्या नेत्यानी दिले होते ,त्या अनुषंगानेच आदिमने सातत्याने आंदोलन करुन भाजप सरकारला विनंती केली पण या दहा वर्षांत न्याय तर मिळालाच नाही ऊलट अन्यायच होत गेले आणि विश्वासघातही होत आला आहे.

या परिस्थीतीचा विचार करूनच राष्ट्रीय आदिम कृति समितीला आंदोलन करावे लागत आहे.लवकरच निवडणुका येणार आहेत,त्यापूर्वीच सरकारने आपले शब्द व आश्वासन पुर्ण केले नाही तर या सरकारला खाली खेचावे लागेल तसा ईशारा देण्यासाठीच राष्ट्रीय आदिम कृति समितीच्या माध्यमाने या धरणे आंदोलनाचे प्रयोजन आहे. संविधान चौकातील या धरणे आंदोलनात हजारोंच्या संख्येत शनिवार १० फेब्रुवारी २०२४ रोजी सामील होऊन आपली एकजुटता दाखवून आवाज बुलंद करा.असे आव्हान राष्ट्रीय आदिम कृती समितीचे संयोजक आमदार विकास कुंभारे,विश्वनाथ आसई, ॲड.नंदा पराते, धनंजय धापोडकर,प्रकाश निमजे, प्रवीण भिसीकर,दीपराज पार्डीकर,राजू धकाते, देवराव नंदनवार,धनराज पखाले,मनोहर घोराडकर,अश्विन अंजीकर,नरेंद्र भिवापूरकर,राजू ताबुतवाले, विलास पराते,कांता पराते,जिजा धकाते,यशस्वी नंदनवार,छाया खापेकर,दिपक देवघरे,दिपक उमरेडकर,हरेश निमजे,वासुदेव वाकोडीकर,संगीता सोनक,पंकेश निमजे,चेतन निखारे, शुभम पौनीकर,रवी पराते यानी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वनहक्क कायदा व सामुहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत शरद पवार आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची सकारात्मक चर्चा

Wed Feb 7 , 2024
नागपूर :- जेष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या समवेत दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी दिल्ली येथे वनहक्क कायदा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी या विषयासंदर्भात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करतांना सामुहिक वनहक्क प्रक्रिया देशात व महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविणे आणि ज्या ग्रामसभांना सामूहिक अधिकार मिळाला त्यांना येत असलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com