– सामाजिक संस्थांच्या सहकार्याने श्रमदान
नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून १७ सप्टेंबर २०२४ ते ०१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत रविवारी २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता सर्व दहाही झोनमध्ये भव्य स्वच्छता अभियान (श्रम दान) राबविण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात हे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात दहाही झोनमध्ये मनपाद्वारे स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने श्रमदान केले जाणार आहे. या अभियानामध्ये शहरातील बहुसंख्य नागरिकांनीही सहभाग नोंदवून स्वच्छ नागपूरसाठी योगदान द्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.