भव्य भूमिपूजन समारंभ संपन्न

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 28 : –राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनीलबाबू केदार यांच्या सहकार्याने व जि प सदस्य प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या विशेष प्रयत्नातून NMRDA अंतर्गत ४ कोटी रु. चा निधीतुन मंजूर करण्यात आलेला बहादूरा-तरोडी-पांढुर्णा रस्त्याचे भूमिपूजन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले. तसेच खरबी ते जिजामाता नगर, तरोडी (खू) पर्यंतचा जो रस्ता अतिशय खराब आहे. त्याकरिता तेथील नागरिक मंत्री नाक सूनिल केदार कडे निवेदन घेऊन आले असता या निवेदनाची दखल घेत मंत्री केदार यांनी १५ दिवसाच्या आत त्या रस्त्याचे भूमिपूजन होऊन काम सुरू दिसेल असे आश्वासन दिल्याने नागरिकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी प्रामुख्याने माजी अध्यक्ष सुरेश भोयर सत्तापक्ष नेता जि प सदस्य प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे,कामठी पंचायत समिती उपसभापती आशिष मल्लेवार, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी , कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिकेत शहाणे , भारतीताई देवगडे सरपंच गट ग्रा.पं. खेडी (पांढुर्णा), अजय राऊत संचालक कृ.उ.बा.स नागपूर, विनोद शिंदे, सचिन उके, सुनील कांबळे, शेखर टाले, राजू रहांगडाले, गोपाल वर्धेवार, परमेश्वर कुंभरे, मनोहरजी कोरडे, अतुल बालबुधे विजय खोडके सचिन मांडवकर, शुभांगीताई गावंडे, मनिशाताई कुंभरे, वैशालीताई कोकुर्डे, शाम पांचबुधे, विलास गावंडे, मनोहर मटाले, विष्णू अगम, दिगंबर हजारे, पटलेजी, अनिल झोडगे, राजू बागडे,नितेश सातनुरकर, गोपीचंद ढोने, सेवकरामजी धोटे, पुरुषोत्तम देवगडे, दुमदेवरावजी नारनवरे, दुर्गाप्रसाद घरत, सुरेश ढोणे, संजय गावंडे, मारोती ढोणे, आणि सर्व अधिकारी कर्मचारी व बहादुरा, तरोडी, पांढुर्णा येथील समस्त नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यातील कुत्र्यावर पार्वो व्हायरस चा संसर्ग

Mon Mar 28 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 28:-कामठी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मोकाट श्वानांचा वावर वाढला असून त्या मोकाट कुत्र्यावर पार्वो व्हायरस चा संसर्ग होत आहे तसेच पाळीव कुत्र्यातही गॅस्ट्रो सारख्या रोगासह पार्वो व्हायरस चा संसर्ग वाढत आहेत.या संसर्ग झालेल्या कुत्र्यावर वेळीच उपचार न झाल्यास मोकाट श्वानांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहेत. कामठी च्या पशु वैद्यकीय रुग्णालयात दररोज दोनच्या वर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!