संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामपंचायत चिकना (बो.) येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत भूमिगत नाली मंजुर निधी 5 लक्ष रू. ग्रामपंचायत भवन निधी 12 लक्ष रू. आणि मौजा बोरगाव येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर निधी 3 लक्ष रू. तसेच ग्रामपंचायत जाखेगांव येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम 10 लक्ष रू. आणि अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजने अंतर्गत नाली बांधकाम मंजूर निधी 4 लक्ष रू. तसेच ग्राम पंचायत जाखेगाव येथे अंगणवाडी केंद्राचे उदघाटन निधी ११ लक्ष रू. उपरोक्त एकूण निधी ४५ लक्ष रू. चा भूमिपूजन व उदघाटन सोहळा प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर यांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी .दिलीप वंजारी (उपसभापती प.स. कामठी) नंदकिशोर खेटमले (सरपंच चिकना),भारती सचिन भोयर (सरपंच जाखेगाव), संभाजी गावंडे (माजी सरपंच चिकना), सुभाष क्षीरसागर (उपसरपंच जाखेगाव), रविंद्र बांगलकर सदस्य चिकना ग्रा. पं.,. सुनंदा आखरे (सदस्य ग्रा. पं. जाखेगाव) लता मानवटकर (सदस्य ग्रा. पं. जाखेगाव) सूरज मानवटकर (सदस्य ग्रा. पं. जाखेगाव), पुंडलिक धानोरकर, रुपचंद रोहनकर, शुद्धोधन मानवटकर, अशोक आखरे, भागवत आखरे, दशरथ मानवटकर, सचिन भोयर, विश्वनाथ राऊत, अरुण ठवरे, रामा भाकरे, नेमदास लोणारे, ग्रा.पं. सचिव उके , आणि मान्यवर, पदाधिकारी व गावकरी नागरिक उपस्थित होते.