खापरखेडा :-पोटा ग्रामपंचायत येथील ग्राम पंचायत सदस्य शीतल नितीन गोस्वामी यांना अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशाने अपात्र घोषित केले. हा आदेश 24 डिसेंबर 2024 रोजी अप्पर जिल्हाधिाऱ्यांमार्फत निर्गमित करण्यात आला. आदेशानुसार एक महिन्या नंतर ग्राम पंचायत ला मंगळवारी हा आदेश प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1- अ) नुसार दिलेल्या मुदतीच्या आत निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमानपत्र सादर केली नसल्याने अपात्र घोषित करण्यात आले.
सरपंचास अपात्र बाबद् दिली होती तक्रार
अपात्र ठरविण्यात आलेल्या ग्राम पंचायत सदस्य शीतल नितीन गोस्वामी यांनी व यांच्या चार ग्राम पंचायत सदस्य यांनी मिळून पोटा ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या विरुद्ध अप्पर आयुक्त माधवी खोडे यांच्या कडे गैरव्यवहार केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात सरपंच पवन धूर्वे यास माधवी खोडे यांनी क्लीन चिट दिली होती. अप्पर आयुक्त माधवी खोडे यांच्या आदेशाला आव्हान करत शीतल गोस्वामी व त्यांचे इतर सदस्य यांनी मंत्रालयात ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे अर्ज केला होता. सरपंच पवन धुर्वे यांना ग्राम विकास मंत्री यांनी अपात्र घोषित केले होते. ग्राम विकास मंत्री यांच्या आदेशाला सरपंच पवन धुरवे यांनी उच्च न्यायालयात आव्हान करून स्टे मिळविला आहे.