बेला :- सोनेगाव बेला हा रस्ता नव्याने सिमेंट काँक्रीटचा होत आहे. बांधकाम सुरु असताना दहेली येथील शेतकऱ्याला मुरूम पसरवणाऱ्या ग्रेडर मशीनने वीस फूट फरकटत नेले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
भाऊराव पांडुरंग आंबुलकर वय 70 रा. दहेली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आपल्या शेतात काल 17 जानेवारी बुधवार ला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास वन्य प्राण्यांपासून शेताचे संरक्षण व्हावे यासाठी राखण करण्यासाठी जात होते. बांधकामाच्या रस्त्याने जात असताना ग्रेडर मशीन क्रमांक एम एच 31 fE 3385 ने त्यांना फरपटत नेले. त्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या जागीच मृत्यू झाला.
मृत शेतकऱ्याकडे अवघी तीन एकर शेती आहे यात या तुटपुंज्या मालमत्तेवर ते आपल्या कुटुंबीयां कुटुंबीयांची उपजीविका भागवत होते.2 मुले व 1मुलगी असे दोन अपत्य त्यांना आहे.
राज्य क्रमांक २८५ सोनेगाव ते बेला या रस्त्याची रस्त्याचे अभी कंट्रक्शन कंपनी चौपदरीकरणाचे सिमेंट बांधकाम करत आहे., एकाच वेळी दोन्ही बाजूने खोदकाम व मुरूम टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे लहान मोठ्या वाहनांना वाहतूक करणे मुश्किलीचे झाले आहे . त्यामुळे दररोज सहा किलोमीटर दरम्यान कुठे ना कुठे किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहे. पायदळ चालणाऱ्या शेतकऱ्याला फरकटत नेत मृत्यू झाल्याची घटना कळताच दहेली येथील असंख्य संतप्त शेकडो नागरिक घटनास्थळी गोळा झाले होते. त्यांचे मनात संतापाची लाट पसरली आहे . परंतु पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली व शांतता कायम केली त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र वृत्त लिहितोवर बेला पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी तातडीने भेट दिली.
प्रतिक्रिया = दोन्ही बाजूने खोदकाम सुरू असून अर्ध्या एक पदरी रस्त्या वरून दोन्ही बाजूच्या गाड्या जातात .त्यामुळे अपघात होईल. असे ठेकेदाराला नेहमीच सांगत आलो. बांधकामा बाबत रस्त्यावर सांकेतिक निशाणी व सूचना लावण्यात आली नाही. बांधकाम करणाऱ्या कंपनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणातून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. कामादरम्यान धूळ पसरत असल्यामुळे वाहन चालका चे डोळ्यांना खूप त्रास होतो त्यामुळे रस्त्यावर दररोज नेहमी पाणी मारणे गरजेचे आहे.
-किसना तुरणकर, माजी सरपंच दहेली