राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण

मुंबई :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी आयोजकांकडून माहिती घेतली व महापरिनिर्वाण दिन गांभीर्यपूर्वक व्हावा यासाठी सूचना केल्या.

दिनांक १ व ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत देशभरातून तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून अनुयायी चैत्यभूमी येथे महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. या सर्व अनुयायांना प्रवास, निवास, वैद्यकीय सुविधा, पोलीस सहायता या व इतर गोष्टींची अधिक माहिती असावी या दृष्टीने माहिती पत्रक काढण्यात आले असल्याची माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी यावेळी राज्यपालांना दिली.

महापरिनिर्वाण दिन अभिवादन कुठल्याही अनुचित घटनेशिवाय व्हावा या दृष्टीने माहिती पुस्तके लोकांना पाठवली जातील. तसेच पोस्टर राज्यातील विविध वस्त्यांमधील बुद्ध विहारांमध्ये लावली जातील, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला भदंत भन्ते डॉ. राहुल बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक त्रिशरण बुद्धपूजा पाठ घेण्यात आली.

यावेळी समितीचे महेंद्र साळवे, सिद्धार्थ कासारे, मयूर कांबळे, आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेसाठी अर्ज आमंत्रित

Wed Nov 29 , 2023
नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी मार्फत ‘छत्रती शिवाजी महाराज सारथी’ जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थांकडून महाविद्यालयातील मुला मुलींसाठी वसतिगृह चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संस्था निवडीचे पात्रता निकष अटी शर्ती या सारथी संस्थेच्या http://sarthimaharashtragov.in या संकेतस्थळवर उपलब्ध असून अर्ज 20 डिसेंबर 2023 उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी नागपूर (शहर), विभागीय कार्यालय (सारथी) नागपूर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com