राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण

कृषी क्षेत्रात प्रगती झाली नसती तर करोना काळात उपासमारी झाली असती

शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना

मुंबई – कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहून शेतकऱ्यांनी पुनश्च सेंद्रिय शेतीची कास धरावी असे सांगताना  कृषी विद्यापीठांनी शेतीचे आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी आपण सर्व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना करूअसे  राज्यपालांनी सांगितले.

वंदे भारत विकास फाउंडेशन व ॲडराईज इंडिया यांनी शेतकऱ्यांच्या शिक्षणप्रशिक्षण व कौशल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या वंदे किसान ॲपचे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २) राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार आशिष शेलारॲडराईज इंडिया व वंदे भारत विकास फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद कुलकर्णीव्यवस्थापकीय भागीदार अनिरुद्ध हजारेप्रगतिशील शेतकरी व पद्मश्री राहीबाई पोपेरेडॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.

देश अन्नधान्याच्या बाबतीत आयातदार असल्याचे आपण पहिले आहे. त्याकाळात  देशात अमेरिकेकडून निकृष्ट गहू येत होता. भारताने गेल्या ४० -५० वर्षांत कृषी क्षेत्रात मोठी प्रगती केली नसती तर करोना काळात अर्थव्यवस्था ठप्प असताना हजारो लोक उपासमारीचे बळी झाले असते, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.    

आज गावागावातील शेतकऱ्यांना नवीनतम ज्ञान हवे आहे. मोबाईल ॲप व डिजिटल माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोबाईल कनेक्टिव्हीटी चांगली असली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

वंदे किसान डिजिटल व्यासपीठ हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्यातून हे ॲप देशभर प्रचलित होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. 

प्रत्येक गावात देशी वाणाची बीज बँक असावी: पद्मश्री राहीबाई पोपेरे

हायब्रीड बियाणे तसेच रासायनिक शेतीमुळे अनेक आजार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी तसेच प्रत्येक गावात देशी वाणाची बीज बँक असावी असे बीज बँकेच्या पुरस्कर्त्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी यावेळी सांगितले

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी धीरज जुनघरेडॉ सदानंद राऊतशेती हवामान तज्ज्ञ डॉ उदय देवळाणकरज्ञानेश्वर बोडकेडॉ  सूर्यकांत गुंजाळनारायणगाव ग्रामोन्नती कृषी मंडळ संस्थेचे अनिल मेहरेकृषी पर्यटन तज्ञ चंद्रशेखर भडसावळेकुलगुरू डॉ संजय सावंतऔरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Governor Koshyari launches 'Vande Kisan' App

Fri Dec 3 , 2021
Felicitates progressive farmers and agri enterpreneurs  Mumbai – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari launched the ‘Vande Kisan App’ designed to provide skills and modern education to farmers at Raj Bhavan Mumbai on Thursday (2 Dec). The Application has been developed by Adrise India and Vande Bharat Vikas Foundation. The digital application will provide various skill development courses, crop information and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com