भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले अभिवादन

मुंबई :- राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार राहुल शेवाळे, आमदार संजय शिरसाट, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, जयंत पाटील तसेच, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. अशोक स्तंभाजवळील भीम ज्योतीचे दर्शन घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली.बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

यावेळी भंते बी. संगप्पा महाथेरो, सुमेध बोधी, धम्मप्रीय यांनी मान्यवरांच्या उपस्थिती वंदना पठण केली. चैत्यभूमी स्तूप येथे व्यवस्थापक भिकाजी कांबळे, प्रतीक कांबळे, रमेश जाधव, अध्यक्ष उत्तम मग्रे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवा चेतना मंच तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त नमन.

Tue Dec 6 , 2022
रनाळा :- युवा चेतना मंच तर्फे स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त नमम करण्यात आले . याप्रसंगी रनाळाचे माजी सरपंच अरविंद गिरी , वरिष्ठ प्राध्यापक पुरुषोत्तम पाल , गोपाल वंजारी , नामदेव बाबरे , सीमा सुरक्षा बलचे सेवानिवृत्त सैनिक शेषराव अढाऊ , सुभाष हिवरेकर , मारूती ईराबत्ती , दिव्याग फाऊंडेशनचे सचिव बाँबी महेंद्र , […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com