राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट

नागपूर  : नागपूर भेटीवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गुरुवारी २२ डिसेंबर रोजी धंतोली येथील रामकृष्ण मठाला भेट दिली व सर्व भक्तांसह संध्या आरती केली.

राज्यपालांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेतले तसेच माताजी श्री सारदा देवी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना वंदन केले.

त्यानंतर आश्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध सेवाकार्यांबद्दल माहिती जाणून घेतली व विवेकानंद धर्मादाय मल्टी थेरपी डिस्पेन्सरी,ग्रंथालय व प्रकाशन विभागास भेट दिली.

मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रह्मस्थानंद यांनी राज्यपालांचे स्वागत केले.यावेळी स्वामी विपाप्मानन्द,स्वामीज्योतिस्वरूपानंद,स्वामी तन्निष्ठानंद, स्वामी ज्ञानमूर्त्यानंद व इतर साधुवृन्द उपस्थित होता.यावेळी राज्यपालांनी विद्यार्थी स्वयंसेवक तसेच भक्तवर्गाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुयोग येथील गझल मैफलीला कृषीमंत्र्यांची दाद

Fri Dec 23 , 2022
नागपूर : सुयोग पत्रकार निवासस्थानी आज आयोजित गझल मैफलीला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून कलावंतांना भरभरून दाद दिली. सुयोग येथे आज कृषी मंत्र्यांनी भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली व माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुयोग येथील सभागृहात आयोजित मैफलीला उपस्थित राहून गझलगायन सादर करणाऱ्या कलावंतांना भरभरून दाद दिली. शिबिरप्रमुख विवेक भावसार उपस्थित होते. नागपूर येथील स्वरराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com