राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली, राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट

नवी दिल्ली :-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली.

येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’ स राज्यपालांनी भेट दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्रालय विभागाचे सह संचालक मनदिप सिंग तुली आणि महानिरीक्षक सशस्त्र सीमा बल आर. भुमला यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

याप्रसंगी राज्यपालांना ‘सलामी गार्डस’ ने सलामी दिली. शहीद झालेल्या जवानांना मौन राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यपांलानी राष्ट्रीय पोलीस स्मारकाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुख्य शिल्पाच्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. 

यानंतर येथे असलेल्या पोलीस संग्रहालयास राज्यपांलानी भेट दिली. या ठिकाणी ज्या पोलीसांनी त्यांचे कार्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी येथे ‘शौर्य भिंत’ बांधण्यात आलेली आहे. यासह सुरूवातीपासून आतापर्यंत पोलीस व्यवस्थेतील बदल येथे सुसज्ज्‍रीत्या दर्शविण्यात आलेले आहे. हे पाहताना राज्यपालांनी शहीद पोलीसांच्या स्मृतीस नमन करून आदार व्यक्त केला .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नरेंद्र मरगडे की बेसा और बेलतरोडी के प्रमुख, नागपूर ग्रामीण पर नियुक्ती

Mon Oct 31 , 2022
नागपूर :- शिवसेना भारतीय कामगार संघटना, माथाडी और जनरल कामगार युनियन नागपूर की ओर से बेसा, बेलतरोडी के प्रमुख पदपर नरेंद्र मरगडे को नियुक्ती दी गई है | यह नियुक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता किशोर भाऊ कन्हेरे के हस्ते दी गई है । इस अवसर पर जेष्ठ शिवसैनिक शाम चौधरी, भारतीय कामगार संघटन के जिल्हाध्यक्ष राजेश रंगारी, गजानन चकोले, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com