अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई :-  ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात, तसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था गोपालन व गोरक्षणाचे कार्य अहिमहिकेने करीत आहेत. अश्यावेळी पंचगव्यासह विविध गौउत्पादनांचा अधिकाधिक वापर करून गायीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना द्यावी,’’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.   दिन्डोशीनगर, गोरेगाव मुंबई येथे प्रथमच आयोजित केलेल्या एक आठवड्याच्या ‘गऊ ग्राम महोत्सवा’चे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 12) झाले, त्यावेळी ते बोलत होते.

महोत्सवाचे आयोजन ‘गऊ भारत भारती’ या गायीच्या संवर्धनाला समर्पित वृत्तपत्राच्या वतीने करण्यात आले. रासायनिक खतांऐवजी गायीचे शेण तसेच गोमूत्र यांचा वापर करून एक एकर पर्यंत शेती करण्याचा प्रयोग देशात यशस्वीरीत्या झाला असल्याचे नमूद करून लोकांनी गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करावी तसेच गौ आधारित उत्पादने वापरावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून गाय महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

गायीपासून मिळणारी केवळ दोन-चार उत्पादनेच अधिकांश लोकांना माहिती आहे असे सांगून गौउत्पादनांची मागणी निर्माण करून गो-पालक व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ‘गऊ भारत भारती’चे संपादक तसेच महोत्सवाचे निमंत्रक पत्रकार संजय ‘अमान’ यांनी यावेळी सांगितले.

युवती व लहान मुलींनी यावेळी श्रीकृष्ण लीलांवर आधारित नृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते गोसेवा कार्यास योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला महेंद्र काबरा, संतोष शहाणे, राम कुमार पाल, संजय बलोदी ‘प्रखर’, हरीश बोरा, आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुंठेवारी अंतर्गत वडगाव प्रभागातील बांधकामे नियमित करण्याची संधी, परवानगी न घेतल्यास कारवाईचे आयुक्तांचे निर्देश    

Fri Oct 14 , 2022
चंद्रपूर :- गुंठेवारी विकास अंतर्गत मौजा वडगाव प्रभागातील १० अभिन्यास मंजूर झाले असुन सदर सर्व्हे नंबर मधील भुखंड / बांधकाम धारकांनी लवकरात लवकर नियमित करून घ्यावे अन्यथा सदर बांधकामे अनधिकृत समजण्यात येऊन त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्पष्ट केले आहे.  महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम २००१ अंतर्गत मौजा वडगाव प्रभागातील सर्वे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!