गुंठेवारी अंतर्गत वडगाव प्रभागातील बांधकामे नियमित करण्याची संधी, परवानगी न घेतल्यास कारवाईचे आयुक्तांचे निर्देश     

चंद्रपूर :- गुंठेवारी विकास अंतर्गत मौजा वडगाव प्रभागातील १० अभिन्यास मंजूर झाले असुन सदर सर्व्हे नंबर मधील भुखंड / बांधकाम धारकांनी लवकरात लवकर नियमित करून घ्यावे अन्यथा सदर बांधकामे अनधिकृत समजण्यात येऊन त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्पष्ट केले आहे.  महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम २००१ अंतर्गत मौजा वडगाव प्रभागातील सर्वे नं वडगाव ५२/१,५२/२, वडगाव ४५/१ क, १६/१ पैकी, १५/१ अ, वडगाव १८, वडगाव ८१/३,वडगाव देवई -गोविंदपुर रै. १०७/५६ अ, वडगाव १८ पैकी, वडगाव ४५/१ अ, वडगाव १६/१ व १७ चे अभिन्यास मंजुर झालेले आहेत. यातील काही सर्व्हेनंबरमधील बांधकामांना यापुर्वी मनपातर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही परवानगी घेण्यात आलेली नाही. सदर सर्व्हे नंबर मधील भुखंडधारकांना आपले भुखंड / बांधकाम महानगरपालिकेकडुन परवानगी घेऊन नियमित करण्याची ही संधी आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालीकेतर्फे करण्यात येत आहे.

बांधकाम परवानगीसाठी कागदपत्रांची पूर्तता ऑनलाईन करतांना येणाऱ्या समस्यांविषयी प्रॅक्टिसिंग आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स असोसिएशन चंद्रपूर यांच्या वतीने महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. निवेदनासंदर्भात बैठकीत परवानगी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासंबंधात सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच ऑनलाईन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सॉफ्टवेअर प्रशिक्षण शिबीर घेण्याचे आयुक्त यांनी निर्देश दिले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com