मुकेश श्रीकृष्ण मते यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी – मेघा मते (आई )

– सख्ख्या मोठ्या मुलांच्या त्रासामुळे आईचा व लहान मुलांचा कधीही जीव जाऊ शकतो !

– सचिव मेघा मते नी न्यायासाठी परिषदेत घेतली धाव !

नागपूर :- ग्रामोद्वार विद्या प्रसारक शिक्षण संस्था हिंगणा येथील नागपूरच्या सचिव अधिकृत पदावरील मेघा श्रीकृष्ण मते तसेच यांच्या अंतर्गत अहिल्यादेवी होळकर अनुदानित आदिवासी आश्रम शाळा उखळी येथील दोन स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना तिच्या मोठ्या मुलाने नोकरीतून कार्यमुक्त केले त्या संदर्भात पत्रकारांना पूर्ण माहिती दिली. आणि माझ्या मोठ्या मुलाने म्हणजे मुकेश मतेने या कर्मचाऱ्यांना काढून टाकले. त्याची कल्पना मला नव्हती आज मी त्यांच्या पाठीशी उभी आहे. माझ्या मुलाच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. माझा मुलगा गेल्या चार वर्षापासून मला या शाळेमध्ये पाय सुद्धा ठेवू देत नाही. माझा नेहमीच तो अपमान करतो आणि धमक्या देतो यांनी जबरदस्तीने माझ्याकडून 35 लाखाची खंडणी वसूल केली आहे आणि सतत धमक्या देतो. मला मारतो. मुकेश मतेवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहे. तीन महिने जेल मध्ये राहून तरी हा सुधारलेला नाही आणि शासनाची दिशाभूल करीत आहे. त्यांने राजीनामा दिल्यानंतरही पगार घेत आहे. असा सुद्धा आरोप तिने पत्रकार परिषदेत लावला.

मुकेश मते हा माझा मुलगा आहे याच्या पासून मला व माझ्या लहान मुलाला ईश्वर मते यांच्या जीवाला धोका आहे हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध बरेच गुन्हे दाखल असून तो क्रिमिनल वृत्तीचा आहे. मुकेश मतेंनी या संस्थेत 2 / 5 / 2021 रोजी स्वखुशीने राजीनामा दिलेला आहे. परंतु यामध्ये माध्यमिक हेडमास्तर अमोल पंचबुद्धे यांच्याशी संगणमत करून परत नोकरीवर ठेवले आणि पगार सुद्धा घेतो आहे. हे दोघेही शासनाची दिशाभूल करीत आहे. यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. माझ्या जीवाला व माझ्या लहान मुलांच्या जीवाला धोका आहे. जर आमच्या जीवाला काही झालं तर माझा मोठा मुलगा मुकेश मते जबाबदार राहील. असे सांगितले.

प्रकल्प अधिकारी यांनी मुकेश मते यांच्यावर 16 लाख 52 हजार 919 रुपयाची वसुली काढली आहे तरी सुद्धा शाळेचा हेडमास्तर मुकेश मतेचा वारंवार पगार काढत आहे व शासनाची दिशाभूल करीत आहे. मुकेश मते यांनी नियमबाह्य अतुल केचे (स्वयंपाकी) आणि राजू ठवकर ( स्वयंपाकी) यांना कोणतेही आदेश न देता किंवा नोटीस न देता मुकेश मते यांनी दामोधर हारगुडे मुख्याध्यापक यांना हाताशी घेऊन त्यांना कार्यमुक्त केले. याला कोणी अधिकार दिले ? यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजेत. या प्रकरणात नागपूर जिल्ह्याचे कलेक्टर आणि हिंगणा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी. अशी मागणी करित पत्रकांरांना आपबीती सांगितली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

GST Registration में हो रही देरी पर जी.एस.टी. मुख्य आयुक्त के.सी. जाॅन को NVCC ने प्रतिवेदन दिया

Fri May 31 , 2024
नागपूर :- विदर्भ के व्यापारियों की अग्रणी व शीर्ष संस्था नाग विदर्भ चेंबर आॅफ काॅमर्स के अध्यक्ष अर्जुनदास आहुजा ने चेंबर के उपाध्यक्ष स्वप्निल अहिकर, सहसचिव शब्बार शाकिर, PRO हेमंत सारडा व चेंबर की अप्रत्यक्ष कर उपसमिती के संयोजक सी.ए. रितेश मेहता के साथ जी.एस.टी. एवं उससे संबंधित नियमों के विभिन्न मुद्दों पर के.सी. जाॅन (मा. मुख्य आयुक्त, राज्य जी.एस.टी., […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com