राजधानीत सद्भावना दिन साजरा

नवी दिल्ली :- महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन आज साजरा करण्यात आला.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. यावेळी रुपिंदर सिंग यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.

यावेळी सदनातील अपर निवासी आयुक्त  नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व स्मिता शेलार इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा

महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी स्व. राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी स्व. राजीव गांधी यांना यावेळी आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मिशन अध्यक्ष अँड.निलेश हेलोंडे पाटील यांच्याकडून गायरान क्षेत्र कुरण विकास कार्यक्रमाची पाहणी

Tue Aug 20 , 2024
यवतमाळ :- पशुधन असलेल्या गावांमध्ये जनावरांसाठी उत्तम दर्जाचे वैरण उत्पादन व्हावे यासाठी शासनाच्यावतीने वैरण विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी वैरण विकासाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी वणी तालुक्यातील कायर येथे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अँड. निलेश हेलोंडे पाटील यांनी भेट देऊन गायरान क्षेत्रावर कुरण विकास कार्यक्रमाची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी गावकरी तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com