अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत, या पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांना बसला असून गोंदिया-तिरोडा राज्य महा मार्गाचा काम सुरू असताना एकोडी गावाजवळ पुलिया बांधकाम सुरु आहे , त्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र तो रस्ताही पावसाने वाहून गेल्याने गोंदिया तिरोडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुख्य राज्य मार्गावरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे.