अमरदिप बडगे , प्रतिनिधी
गोंदिया :- गोंदिया आरपीएफ पोलिसांनी सुरू असलेल्या ऑपरेशन नार्कोस अंतर्गत गाडी क्रमांक २२९७४ पुरी-गांधी एक्सप्रेस च्या कोच क्रमांक डी २ मध्ये तपासणी करत असताना १ राखडी रंगाची बैग जी बेवारस अवस्थेत आढळून आली. असून तिची तपासणी केली असता, त्या मध्ये तीव्र वासासह गांज्यासारखे अमली पदार्थ असल्याचे आढळून आले.
त्याचे वजन ५.५४० किलो असून त्याची किंमत ५५ हजार ५४० रुपये आहे. आरपीएफ पोलिसांनी ते जप्त करत गोंदिया रेल्वे पोलिसानं कडे सुपूर्द करण्यात आले असुन त्यांनी अज्ञाताविरुद्ध कलम 8 (C), 20 (B) (ii) NDPS अंतर्गत गुन्हा क्रमांक 0061/2022 दाखल केले आहे.