वीजबिल थकबाकीतून मुक्ती आणि नवीन वीज जोडणीची सुवर्णसंधी

– नागपूर जिल्ह्यातील 9 हजार 823 ग्राहकांना महावितरणचे अभय

नागपूर :- थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल 9 हजार 823 ग्राहकांना ग्राहकांना महावितरणने अभय योजनेच्या माध्यमातुन वीजबिल थकबाकीतून मुक्ती आणि नवीन वीज जोडणीची सुवर्णसंधी दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यतील एकूण 9 हजार 823 ग्राहकांनी 17 कोटी 32 लाख रुपयांचा भरणा करीत या योजनेत सहभाग नोंदविला आहे.

या योजने अंतर्गत सर्व उच्च व लघुदाब थकबाकीदार ग्राहकांना (कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून) ही एक संधी उपलब्ध झाली आहे. पूर्ण मुद्दल भरल्यास वीज बिलातील 100 टक्के व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येत आहे. महावितरण अभय योजनेमध्ये 31 मार्च 2025 पर्यंत सहभाग घेता येणार आहे.

पात्रतेचे निकष

दिनांक मार्च 2024 रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्चदाब व लघुदाब ग्राहक (कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक वगळून) या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत.

योजनेचे फायदे आणि निकष

ग्राहकांनी देय असलेल्या रकमेतून 100 टक्के विलंब आकार आणि व्याज माफ केले जात आहे आणि 100 टक्के मुळ थकबाकी रक्कम भरल्यानंतर कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जात नाही. ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम 100 टक्के एकरकमी भरण्याचा किंवा किमान 30 टक्के डाऊनपेमेंटसह जास्तीत जास्त 6 हफ्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

उच्चदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर 5 टक्के अतिरिक्त सवलत तर लघुदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर 10 टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

असा लाभ घ्या

संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतीय डाक ग्रामीण सेवक पदासाठी 3 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Mon Feb 17 , 2025
नवी मुंबई :- अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभागाच्या कार्यक्षेत्रातील 21 रिक्त पदे भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावरुन 3 मार्च, 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरावेत. असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई यांनी कळविले आहे. भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. या जाहिरातीनुसार अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभागाच्या कार्यक्षेत्रातील 21 रिक्त पदे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!