– खासदार क्रीडा महोत्सव
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत शुक्रवारी (ता. १९) विवेकानंद नगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तायक्वाँडो स्पर्धेतील सबज्यूनिअर्स गटात मेधांश शंभरकर आणि प्राची चौधरी यांनी आपापल्या वजन गटात यश मिळवित सुवर्ण पदक पटकाविले.
१२ वर्षाखालील मुलांच्या सबज्यूनिअर्समध्ये ३२ किलोखालील वजनगटात मेधांश शंभरकरने तन्मय निनावे याला मात देत प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदकावर नाव कोरले. तन्मयला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर नक्ष बावणेने कांस्य व अथर्व जंजाले यांना दुस-या क्रमांकाच्या कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
याशिवाय १२ वर्षाखालील मुलींच्या सबज्यूनिअर्समध्ये २६ किलोखालील वजनगटात प्राची चौधरीने शरनय वैद्यला मात देत सुवर्ण पदक पटकाविले. या सामन्यात शरनयला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर सना ग्रोवारने कांस्य प्रथम आणि सिद्धी पडोळेने कांस्य द्वितीय पदक आपल्या नावे केले.
निकाल: (अनुक्रमे १ ते ४)
सबज्यूनिअर मुले (12 वर्षाखालील)
३२ किलोखालील गट – मेधांश शंभरकर, तन्मय निनावे, नक्ष बावणे, अथर्व जंजाले
३५ किलोखालील गट– तेजस नंदनवार, सिद्धान्त रामटेके, अभीर बहादुरे, रेयांश पाटील
३८ किलोखालील गट– मिथलेश काणारे, अभय गणवीर, मोरेश्वर धोंडाळकर, हनी मोहरले
४१ किलोखालील गट– सात्विक बनकर, भागर्व रेवतकर, तोशीन खापडे, चिराग देऊळकर
४४ किलोखालील गट– दीप नैताम, अविनाश शिंदे, दिव्य सेलोकर, सास्वत मस्के,
५० किलोखालील गट– अद्वैत कोलकुठे, पार्थ कुमार, राजाझ सतवाने, नैतिक बावणे.
सबज्यूनिअर मुली (12 वर्षाखालील)
२६ किलोखालील गट – प्राची चौधरी, शरनय वैद्य, सना ग्रोवर, सिद्धी पडोळे
२९ किलोखालील गट- उन्नती राहटे, रुद्राणी अंबागडे, हिमांशी गोकरे, ओमश्री घोडसकर.
३२ किलोखालील गट- उन्नती गंगामवर, कनक दिंगे, सुनहरी धांडे, सानवी देशमुख.
३५ किलोखालील गट- कर्णिका सिंह, शास्वती भोयर, सनवी शुक्ला, शिवानी झाला.
३८ किलोखालील गट- नंदिनी सोनटक्के, रितिका सिंह, सनवी जैस्वाल, अविका हरकंठ,
४१ किलोखालील गट- यशस्वी शेळके, शरयू पाठक, श्रेया वाडीभस्मे, राधिका तिवारी,
४७ किलोखालील गट- श्रीगौरी बेडेकर, टीना वैद्य, औनी तोमर, आराध्या