सोनसाखळी लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

नागपूर :- फिर्यादी नामे रंजना गणेश सोनसरे, वय ४२ वर्ष रा. वलनी जि. नागपूर ही एकटी आपले ठेक्याच्या शेतातुन घरी येत असता काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसम यांनी फिर्यादीच्या गळयातील सोन्याची गरसुळी हिसकावुन दोन्ही इसम मोटरसायकलने पळून गेल्याचे फिर्यादीचे तोंडी रीपोर्ट वरून पोलीस ठाणे कळमेश्वर येथे अप. क्र. ५११/२४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. स. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक स्थनिक गुन्हे शाखा यांनी आपल्या अधिपत्याखाली अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून तपासाच्या सुचना दिल्या. दि. १९/०७/२०२४ रोजी पो.स्टे. कळमेश्वर अप. क्र. ५११/२४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. स. गुन्ह्यात समांतर तपास करत असतानी फिर्यादी हिने सांगितलेले आरोपीचे वर्णनावरून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरून आरोपी नामे विशाल उर्फ अशोक जयराम जाधव, वय ३० वर्ष, रा. वडार मोहल्ला गिट्टीखदान यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की, दि. १२/०७/२०२४ रोजी त्याने त्याचा साथीदार नामे व्यंकटी उर्फ मामा धोत्रे, रा. वडार मोहल्ला गिट्टी खदान याचे सह मिळून कळमेश्वर व याच महिन्यात पहिल्या आठवड्यात सावनेर येथे महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने मोटरसायकल वरून हिसकावून पळून गेल्याचे कबूल केले, आरोपीने दिलेल्या माहितीवरून गुन्ह्यात चोरीचा मुद्देमाल १) सोन्याची गडसोडी मधील ०२ नग डोरले व १२ नग सोन्याचे मनी अंदाजे वजन ४ ग्रॅम किंमती २००००/- रु २) सोन्याची चैन लॉकेट सह अंदाजे वजन ८.५ ग्रॅम अंदाजे किंमत ५५०००/-रु. गुन्हयात वापरलेली ३) एक होंडा नलिवो मोटरसायकल दुचाकी क्रमांक एम एच -३६/ डी.ए-४२०८ किंमती ५००००/- रु ४) एक मोवाईल कि. १०००० असा एकूण १,३५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क्र. १) विशाल उर्फ अशोक जयराम जाधव, वय ३० वर्ष, रा. वडार मोहल्ला गिट्टीखदान जि. नागपूर यास ताब्यात घेऊन आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करिता पो.स्टे. कळमेश्वर यांचे ताब्यात देण्यात आले.

उघडकीस आलेले गून्हे

१. पो. स्टे. कळमेश्वर अप क्र. ५११/२४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. स.

२. पो.स्टे. सावनेर अप क्र. ६२०/२४ कलम ३०४(२), ३(५) भा. न्या. स.

सदरची कार्यवाही ही हर्ष ए पोहार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, Psi आशिष मोरखडे, PSI बड्डूलाल पांडे, पोहवा दिनेश अधापुरे, इक्बाल शेख, संजय बांते, विपीन गायधने, प्रमोद भोयर, संजय बरोदीया, रोशन काळे, नितेश पिपरोदे, प्रमोद तभाने, रोहन डाखोरे, मिलींद नांदुरकर, राजू रेवतकर, नाना राउत, विनोद काळे, चालक अमोल कुथे, राकेश तालेवार, शंकर मडावी, गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, अमृत किनगे, किशोर वानखेडे, उमेश फुलवेल, कविता बछले, नितु रामटेके तसेच सायबर सेलचे सतिश राठोड यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीताविरूद्ध धडक मोहीम

Mon Jul 22 , 2024
नागपूर :- पोस्टे नरखेड येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलींग करीत असता यातील आरोपी नामे- बिरबल जंगल्या सोनबरसे, वय ६५ वर्ष, रा. अंबाडा (देशमुख) हा मौजा अंबाडा देशमुख शिवार येथे मोहाफुल गावठी दारू बाळगुन विक्री करताना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून १५ लिटर मोहाफुल गावठी दारु प्रती ५० रुपये लिटर प्रमाणे एकुण कि. ७५० रु. चा. मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com