– गावातील नागरिकांच्या मालकीचे गुरे व बकऱ्या मासिक मजुरीने चारणाऱ्या गुराखी देवराव हटवार यांच्या अंत्ययात्रेत घरापासून तर स्मशान घाटापर्यंत बकरीही झाली सहभागी
कोदामेंढी :- येथील देवराव हटवार (80)यांचे गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबरला सायंकाळ 6:30 दरम्यान वृद्धापकाळातील आजारा पणामुळे निधन झाले.दि. आठ नोव्हेंबर शुक्रवारला निघालेल्या अंत्ययात्रेला घरापासून तर स्मशान घाटापर्यंत जनतेसोबत बकरीही दाहसंस्कार स्थळापर्यत आली. अधीक माहिती घेतली असता सदर बकरी मोहल्लयातील प्रकाश सोनुले यांची असल्याचे कळले. विशेष म्हणजे अंतयात्रेतील जनतेने बकरीला खूपदा हाकलले. पण तरीसुद्धा बकरी परत घरी जात नव्हती.अंतयात्रेची संपूर्ण विधी संपल्यानंतरच अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या मागोमाग ती घरी परत आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मागील आठ वर्षांपूर्वी देवराव हटवार हे गावातील नागरिकांचे मालकीचे गाय व बकऱ्या मासिक मजुरीवर चालणारे गुराखी होते. परंतु त्या वेळचे तत्कालीन मौदा तालुक्यातील सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत कोदामेंढीचे ग्राम रोजगार सेवक किशोर साहू यांनी गाव व परिसर हिरवेगार करण्यासाठी व गावातील नागरिकांना वर्षभर कामे उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत व रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली होती. नरेगाच्या शासकीय अंदाजपत्रकानुसार वृक्ष संवर्धन करण्यासाठी कच्चे काटेरी कुंपणाला मोकळे चरणारे गाय व बकऱ्या भीक घालत नव्हते. कुंपण तोडून ते लागवड केलेल्या झाडांची नासधूस करत होते . त्यामुळे झाडे मरण्याचे प्रमाण जास्त तर जिवंत झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती. नरेगाच्या ब्रीदवाक्य प्रमाणे ‘मागेल त्याला काम, कामानुसार दाम’व ‘जिवंत झाडानुसार मजुरांचे प्रमाण’, असे असल्याने , साहू यांनी गूरे व बकऱ्या चालणाऱ्या गुराखी व शेतकऱ्यांशी वारंवार भांडण करण्याऐवजी व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून गुन्हा दाखल करण्याऐवजी गावातील सर्व मजुरांना विश्वासात घेऊन नरेगाच्या तडजोडीच्या रकमेतून सिमेंटचे खांब (पोल) विकत घेऊन वृक्ष लागवड परिसरात पक्के कुंपण केले. त्यामुळे “साप भी मर गया और लाठी भी नही तुटी “या उक्तीनुसार कायमचा मोकळ्या जनावरांच्या बंदोबस्त केल्याने, वृक्ष लागवड केलेल्या मोकळ्या जागेवर जनावरे चारता येत नसल्याने तत्कालीन गुराखी देवराव हटवार यांनी नागरिकांच्या मालकीचे गुरेढोरे चारणे बंद केले व स्वतःच्या दोन-तीन बकऱ्या स्वतःच्या पत्नीच्या संगतीने त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून वृक्ष लागवड केलेला परिसर सोडून चारायचे. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला बकरी सहभागी झाल्याचे गावात सर्वत्र चर्चेच्या विषय झाला .प्राण्यांचे सुद्धा मनुष्यांप्रती एवढे ऋणानुबंध असते, हे त्यांच्या आज निघालेल्या अंत्ययात्रावरून दिसून आले.