अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – संततधार पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली होती. नदी- नाल्यांना उथान आलेले होते. पुरामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी साचुन घरांना पाण्याचा वेढा पडला होता. यामुळे अनेकांचे राहते घर व गुरांच्या गोठयांना तडी जात घर व गोठे क्षत्रिग्रस्त झाले. यासह शेतात पाणी शिरल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तिरोडा तालुक्यातील मौजा खुरखुडी, मुंडीकोटा, घोगरा, घाटकूरोडा या गावांचा दौरा करत या पूरपरिस्थिती ने झालेल्या नुकसानीचा आढा रविकांत बोपचे , जि.प. सदस्य किरणभाऊ पारधी यांनी घेतला. यादरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे नागरिकांच्या शेतपिकाचे, घर व जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रचंड हाल झाल्याचे दिसून आले.
अतिवृष्टीग्रस्त व पुर पीडितांना मोठ्या मदतीची गरज असून हे एक मोठं संकट असल्याने राज्य सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज आहे व पीडितांना तात्काळ मदत देण्यात यावे, असे मत व्यक्त केले. यासह अतिवृष्टी व पूरग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई मिळावी याकरिता प्राथमिक स्तरावरील सर्वे योग्यरीतीने करण्याचे आदेश क्षेत्रातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना दिलेले आहे. पूरपरिस्थितीचा आढावा घेतांना रविकांत खुशाल बोपचे, किरणभाऊ पारधी जि. प. सदस्य यांच्यासह वनीता भांडारकर पंचायत समिती सदस्य, अतुल भांडारकर, छत्रपती बोपचे सरपंच खुरखुडी, गणेश रहांगडाले, मनोज डोंगरे माजी जि. प. सदस्य, कमलेश आथिलकर सरपंच मुंडीकोटा श् मनोहर राऊत माजी प.स. सदस्य , ग्रामसेवक मालाधरी, रोशनी बारई कृषी सेवक, प्रमोद भांडारकर, आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.