स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. – माजी नगरसेवक संजय कंचर्लावार

भानापेठ प्रभाग क्र. ११  येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.

चंद्रपूर  –  भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे माजी नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून भानापेठ येथील कोलबा स्वामी वाचनालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर  धार्मिक सर,  मधू कुंभारे,  दिवाकर झोडे,  पंकज शर्मा,  केतन मेहता,  सागर हांडे,  दिलीप चिमुरकर, निलेश बेडेकर,  नरेश ठाकरे,  किशोर गुजराथी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. गतवर्षीच्या तुलनेत या शैक्षणिक वर्षीत भानापेठ प्रभागात गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे, या दृष्टीने सर्वांनी जोरदार काम करूया. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांना कष्टाचे बळ दिले तर योग्य लक्ष्य साधता येतील. ज्या विद्यार्थ्यांना या वेळी कमी गुण मिळाले त्यांनी निराश न होता गौरवगुण प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करावे असे यावेळी बोलतांना माजी नगरसेवक संजय कंचर्लावार म्हणाले.
तत्पूर्वी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भानापेठ प्रभागात सुमारे ३५ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मेडल तसेच भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याच प्रमाणे प्रभागातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना नोटबुक भेट देऊन उज्वल शैक्षणिक भविष्याकरिता शुभकामना देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुदर्शन बारापात्रे यांनी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीत मनोज गुजराथी, राकेश परिहार, गणेश धकाते, शुभम ठोंबरे, अक्षय बोकडे आदींनी अथक परिश्रम केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावानंतर अभिनंदनावर आभार व्यक्त करताना केलेल्या घोषणा...

Mon Jul 4 , 2022
मुंबई – रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com