संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांच्या नेतृत्वात दिले निवेदन
कामठी :- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना दि.११ जानेवारी २०२४ ला भारतीय भोई विकास मंडळ संलग्नित जिवन रक्षक दल च्या वतीने अध्यक्ष एड.दादासाहेब वलथरे, उपाध्यक्ष मनोहर भोयर यांचा मार्गदर्शनात व जिवन रक्षक दल चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांच्या नेतृत्वात नुकतेच निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी नीलज शाखा अध्यक्ष खेमराज मेश्राम, साहोली शाखा अध्यक्ष किरण बावणे, सल्लागर कोमल देवगडे, सह असंख्य जिवन रक्षक दल चे स्वयम् सेवकांची उपस्थिती होती.
निवेदनात सांगीतले की. महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी जिवन रक्षक दल चे स्वयम् सेवक आहेत ते मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक होणारे धार्मिक उत्सव श्री गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन,व अन्य धार्मिक उत्सव तसेच नदी पात्रात वाहणारे प्रेत,तसेच लहान मोठे तलाव व पर्यटन स्थळी पर्यटकांना वाचविण्याचे काम नित्य नियमाने करीत असून प्रेत काढताना जर जिवन रक्षक दल च्या स्वयम् सेवकांना जिवीत हानी झाल्यास त्याच्या कुटुंबाचे काय? हेच जिवन रक्षक दल चे स्वयम् सेवक पोलीस विभाग, तहसील विभाग व अन्य शासकीय पूर पीडित नागरीकांना तसेच नदी काठावर राहणारे नागरीकांना प्रत्येक पावसाळ्यात शासनाच्या सहकार्याने मदत करने,असे अनेक उपक्रम जीवावर उध्दार होऊन करतात. मात्र या जिवन रक्षक दल चे स्वयम् सेवकांना शासकीय सेवेत त्यांच्या शिक्षणाच्या योग्यतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेत संयुक्त विमा काढून, मानधन देणे,तसेच नदी,तलाव पात्रातील प्रेत बाहेर काढताना त्यांच्या स्वसंरक्षणासाठी साहित्य सामुग्री देणे. हे जिवन रक्षक दल पोहण्यात पारंगत असून विविध भागात आपले नेहमीच कर्तव्य बजावत असतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात होमगार्ड असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात जिवन रक्षक दल च्या स्वयम् सेवकांना समाविष्ट करण्यात यावे. आदी मागण्याचे निवेदन दि. ११ जानेवारीला भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.यावर बावनकुळे यांनी जिवन रक्षक दल चा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.