संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेतकरी तसेच ग्रामस्थांचे जिवन विस्कळीत झाले असून शेतपिकाना चांगलाच फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी आहे मात्र या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे धानाचे परे,सोयाबीन,कापूस,भाजीपाला सह इतर पिके खराब झाली आहेत.त्या पिकाचे चांगलेच नुकसान झाले आहेत,नाग नदीचे पाणी पवनगाव,धारगाव, कापसी, घोरपड आदी गावे तसेच कन्हान नदीचे पाणी सोनेगाव गावामध्ये शिरल्याने गावातील घराचे व अन्न धान्याचे चांगलेच नुकसान झाले आहे.त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी या मागणीसाठी माजी मंत्री सुनीलबाबू केदार व माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर,यांच्या मार्गदर्शनार्थ कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कुणाल इटकेलवार यांच्या नेतृत्वात
आज तहसीलदार गणेश जगदाळे यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना प्रामुख्याने सभापती अनिकेत शहाणे, समितीचे संचालक सुधीर शहाणे,माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,संचालक नंदकिशोर दडमल,माजी सरपंच प्रवीण कुथे,कुणाल शिंगणे,गजेंद्र चौधरी,रोहित इंगोले,हर्षल मारबते,आदी उपस्थित होते.